बीड मधील मराठा समाजाच्या तरुणांवर नाहक गुन्हे करतायत : मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रकार थांबवा, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम

पुणे दिनांक १३नोव्होंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड मधील अधिकारी हे मराठा आंदोलंकावर नाहक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.हा प्रकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने थांबवावा अन्यथा बीड मधील संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर उतरेल व पुढे होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थची जबाबदारी ही सरकारची असेल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी बीड व जालन्यात आंदोलन झाले होते.यावेळी अनेक आंदोलंकाना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.व त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.यावर बोलताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की.बीड जिल्ह्यात मराठा आंदोलंकाना पोलिस हे नाहक त्रास देत आहेत.हा सर्व प्रकार गंभीर आहे.मुख्यमंत्री व गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आधिकांना या बाबत समाज द्यावी .व हे सर्व प्रकार दोन दिवसांत थांबला नाही तर.बीड मधील सर्व मराठा समाज पून्हा एकदा रस्त्यावर उतरेल व यानंतर काही घटना घडल्यास याला हे सरकारच जबाबदार राहील.असे देखील ते म्हटले आहे.व उपोषण सोडत्यावेळी सरकारने आश्र्वासन दिले होते की आंदोलनकर्ते यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असे सांगून.देखील सरकारने गुन्हे मागे न घेता साखळी उपोषण करणांऱ्या आंदोलनकर्ते यांना पोलिस नाहक त्रास देत आहे.हा सर्व प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.