अंतरवाली सराटीत उपोषणकर्ते लाठीचार्ज प्रकरणी : ९ सप्टेंबर रोजी पिंपरी - चिंचवड शहर बंदची मराठा क्रांती मोर्चाकडून हाक

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या उपोषण कर्ते व गावातील आंदोलंकावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ दिनांक ९ सप्टेंबर शनिवारी पिंपरी - चिंचवड मध्ये शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे.याबाबत या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे.तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील या बंदला पाठिंबा दिला आहे.तसेच पिंपरी चिंचवड येथील विविध राजकीय पक्ष या बंदा मध्ये सहभागी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावातील उपोषण कर्ते व आंदोलक व गावातील वयोवृद्ध महिला व पुरुष यांच्यावक्ष अंत्यंत क्रुरपणे लाठीचार्ज करण्यात आला होता.यातील काही नागरिक आजतागायत जालना मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. दरम्यान उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दहावा दिवस असून ते उपोषणावर ठाम आहेत.दरम्यान धाराशिव मध्ये तीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी तलावात उडी मारुन आत्महत्या केली आहे.आज धाराशिव बंदची हाक तेथील गावकऱ्यांनी दिली आहे.व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.सध्याच्या परिस्थितीत धाराशिव मध्ये पोलिसांनी कडक असा बंदोबस्त तैनात केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.