छत्रपती संभाजीनगर मधील घटना राजकीय वातावरण तापण्यांचे चिन्ह? : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा बॅनर फाडला 'एफआयआर' मंत्री छगन भुजबळ यांचं नाव पोलिसात गुन्हा दाखल,

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्रपती संभाजीनगर येथील गवळी शिवाराच्या भागात गरजवंत मराठ्यांचा लढा साखळी उपोषणाचा बॅनर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा अज्ञात व्यक्तीने फाडला आहे.शिल्लेगाव पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून पोलिस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना मराठा समाजाचे आरक्षणांचे बॅनर काढण्या बाबत वक्तव्य केले होते.त्यामुळेच हे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआर मध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास फाडण्यात आला आहे.संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र यात थेट भुजबळ यांचे एफअरआय मध्ये नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान साखळी उपोषणाचा बॅनर फाडल्याची माहिती मिळाल्यानंतर बबनराव डुबे पाटील.संदीप जालिंदर औताडे यांनी पाहणी करून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली व दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले.एवढेच नाहीतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गावा गावात लावलेले मराठा समाजाचे बॅनर काढून टाका असं चिथवणीखोर वक्तव्य जाहीर सभेत केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर हे बॅनर फाडण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.व या सर्व प्रकारास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करणे.जातीय सलोखा बिघडवणे.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.