मराठा आंदोलनांची तीव्रता वाढली : मराठा आंदोलन पेटले बीड येथे मध्यरात्री तहसीलदारांची गाडी अज्ञातांनी पेटवली!

पुणे दिनांक ३०ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन आंदोलनांची तीव्रता आता मोठ्या प्रमाणावर वाढली असून जालना तहसील दाराच्या गाडीची तोडफोड नंतर आता बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तहसील यांची गाडी पेटविण्याची घटना बीड जिल्यातील आष्टी येथील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील सरकारी क्वर्टर येथे चालकाच्या घरा समोर लावली असताअज्ञात व्यक्तीने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पेटवून दिली आहे.
तहसीलदार याची गाडी अज्ञातांनी पेटवल्याची माहिती मिळताच तहसीलदार प्रमोद गायकवाड पोलिस निरीक्षक खएतमआळस आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीला लागलेली 🔥 आटोक्यात आणली आहे.मात्र तोपर्यंत गाडी आगीत जळून खाक झाली होती. दरम्यान ही तहसील यांची गाडी कोणी पेटवली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान या घटने प्ररकणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध आष्टी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पूर्वी जालना तहसील यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली होती. राजकीय नेत्यांन नंतर आता प्रशासकीय अधिकारी यांना टार्गेट केले जात आहे. हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर सुरू झालेले दिसत आहे.आता आंदोलनांची लढाई ही रस्त्यावर आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.