पुण्यात आंदोलक आक्रमक : पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बेंगलोर ते मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ मराठा आंदोलंकानी टायर पेटवून आंदोलन सुरू केले आहे

पुणे दिनांक ३१ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील नवले पूलाजवळ मराठा समाजाच्या तरुणांनी आज दुपारी १२ वाजता पुणे ते बेंगलोर महामार्गावर टायर पेटवून आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर सात किलोमीटर अंतरावर रांगाच रांगा लागल्या आहेत.मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्या तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
मराठा आरक्षणावर मुद्द्यांवरुन संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनाचे लोण पसरले आहेत.पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर आज अचानक पणे गणिमी कावा करत नवले पुलाजवळ दुपारी १२ वाजता या ठिकाणी येऊन महामार्गावर टायर पेटवून 🔥 आग लावून आंदोलन सुरू केले.त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.व तब्बल सात किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या तरुणांनी सुरू केले आहे.व आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले आहेत व ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.पोलिस आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत.पण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.व एक मराठा लाख मराठा.आरक्षण आमच्या हक्काचे आणि ते आम्ही घेणारच असे आंदोलनकर्ते देत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.