मंत्रीमहोदय आले कारने पण आंदोलंकाचे उग्र रूप पाहून धूम ठोकली दुचाकी वरुन : मराठा आंदोलंकांनी गृहनिर्माण राज्यमंत्री अतुल सावे यांना घेराव घातला कार्यकर्तेचे उग्र रूप पाहून चक्क दुचाकीवरुन ठोकली धूम

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी राज्यांचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने राजकीय नेत्यांना ठिक ठिकाणी प्रवेश बंदी केली आहे.सावे हे एका कार्यक्रमासाठी आले होते.त्यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने पवित्रा घेत त्यांना मराठ समाजाच्या आरक्षणाबाबत जाब विचारला व घेराव घातला यावेळी ४० दिवसांत काय केले? असा प्रश्न करून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली.आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा उग्र रूप बघून चक्क मंत्री महाशयांनी कार तिथं सोडून दुचाकीवरुन धूम ठोकली.
दरम्यान यावेळी मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते यात पुरुष कार्यकर्ते यांच्याबरोबर महिला देखील सहभागी झाल्या होत्या व गृहनिर्माण राज्यमंत्री अतुल सावे यांना मराठा समाजाच्या वतीने तीस दिवसांपेक्षा जास्त दहा दिवस असा एकूण ४० दिवस देऊन या कालावधीत राज्य सरकारने काय केले.असा प्रश्र्नं यावेळी आंदोलंकानी जाब विचारला.यावेळी सर्व आंदोलंकाचे उग्र रूप पाहून चक्क कार्यक्रम स्थळी कारनं आलेले सावे आपली कार सोडून दुचाकीवरुन त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली.यावेळी संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा प्रकारे प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी केली.व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेध केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.