बीड जिल्ह्यात मराठा आंदोलन पेटले. : बीड मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटला; आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाची जाळपोळ

पुणे दिनांक ३० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि नंतर पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांना आग लावण्यात आली आहे.व नंतर बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय पेटवून देण्यात आले आहे.व तसेच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आले आहे.तसेच त्यांच्या केएसके काॅलेज व संस्थाला आग 🔥 लावून पेटवून दिले आहे.व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांचे हाॅटेलची जाळपोळ केली आहे.
दरम्यान आज सकाळ पासूनच बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या आंदोलनाचा वणवा आता मोठ्या प्रमाणावर पेटला आहे.बीड शहरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या मोटार सायकल पेटवण्यात आल्या आहेत.व तुफान दगडफेक करून बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.तसेच बीड तालुका येथील वडवणी शहर आणि तालूका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.व आरक्षणांच्या मागणीसाठी तालूका बंद करण्याची हाक देण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.