मराठा समाजाच्या तीन युवकांना अटक.सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली होती टीका : मराठा समाज आक्रमक गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची आज सकाळी तीन मराठा आंदोलंकांनी केली तोडफोड

पुणे दिनांक २६ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे तरुण आक्रमक झाले असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील. व मराठा समाजावर टिका करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील क्रिस्टल टाॅवर येथे आज सकाळी जाऊन पार्किंग येथे असणाऱ्या गाड्यांची प्रचंड प्रमाणावर तोडफोड केली आहे.त्यांनी दोन गाड्यांची तोडफोड व मराठा समाजाचे नेते यांच्यावर टीका केल्याच्या निषेधार्थ व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तोडफोड केली.पार्किंग मध्ये अन्य गाड्या होत्या पण त्यांना काहीही न करता फक्त सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्या आहेत.या प्ररकणी तीन युवकांना अटक करण्यात आले आहे.
दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तीन मराठा युवक हे क्रिस्टल टाॅवर येथे हातात काठ्या व लाठ्या घेऊन आले व त्यांनी सदावर्ते यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत ही घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या तिंघा मध्ये एक युवक हा गेवराईचा सरपंच आहे.या तिन्ही युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.सदावर्ते यांनी जालना येथे झालेल्या सभेवर व मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका केली होती.तसेच जरांगे पाटील यांना अटक करा असे वक्तव्य केले होते.व मराठा समाजाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी आज आक्रमक होत आपला राग व्यक्त करत सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे.असल्याचे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.