Marijuana worth millions seized : लाखोंचा गांजा जप्त; दोघांना अटक

पुणे पोलीसांकडून राबविण्यात येत असलेल्या 'कॉबिंग ऑपरेशन ऑल आऊट' मोहिमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक-2 पथकाने गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले आहे.
पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबविण्याची सूचना सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेला दिली आहे. त्यानुसार कारवाई करत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस शिपाई योगेश मांढरे यांना दोन इसम गांजा विक्री करिता समर्थ पोलीस हद्दीत येणार आहेत अशी माहिती मिळाली.त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांना ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच कारवाईसाठी पथक रवाना केले.
आरोपी अक्षय अशोक रोकडे व करण विलास सुरवसे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 7 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावेळी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांचेकडे प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा आढळून आला. यावेळी आरोपी अक्षय अशोक रोकडे व करण विलास सुरवसे या दोघांना अटक करून त्यांचेकडील 32 किलो 500 ग्रॅम गांजा व मोबाईल रोख रक्कम असा एकूण जवळ पास 7 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनि शुभांगी नरके, पो.शि.योगेश मांढरे, पो.हवा. संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, पो.शि.युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व दिशा खेवलकर यांनी केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.