Bribery employees of Nashik municipality in ABC : नाशिक महापालिका मध्ये भ्रष्टाचारा मध्ये प्रचंड वाढ .लाच घेताना कर्मचारी गजाआड.

  • संपादक : पोलखोलनामा टीम
  • 07 Jan 2023 11:58:27 AM IST
bribery employees of Nashik municipality in ABC

नाशिक विभागात नवीन वर्षातही लाचखोरीचे प्रमाण सुरूच असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या एका महिला लिपिकाने 500 रुपयाची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मनपातील अजून एक कर्मचाऱ्याने लाच घेतल्याची घटना समोर आली आहे.

शहरातील महापालिकेच्या  पश्चिम विभागातील एका लिपिकासह शिपायाला राजीव गांधी भवन या पालिका मुख्यालय पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून 1800 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत बेड्या ठोकण्यात आले आहेत. तक्रारदाराला चहा टपरीचे नाशिक महापालिका हॉर्कर्स झोनमध्ये  बायोमेट्रिक नोंदणी करून पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात पश्चिम विभागातील जाहिरात व परवाना विभागाच्या लिपिक तथा कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ यासह प्रवीण अर्जुन इंगळे या शिपायाने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 1800 रुपये घेण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या सापळा कारवाईत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस नाईक किरण अहिरराव, राजेंद्र गीते, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच देणे आणि घेणे हा कायद्यान्वये गंभीर गुन्हा असून या गुन्ह्यावर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. जेव्हा एखादा सरकारी लोकसेवक त्याचे काम कायदेशीर आणि प्रामाणिकपणे करत असतो आणि कोणी त्याला ते काम बेकायदेशीरपणे करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो देखील गुन्हा आहे. लाच स्वीकारल्याबद्दल किंवा मागणी केल्याबद्दल लोकसेवकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येतो. त्याचप्रमाणे लाच दिल्याच्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीवर लाभ देण्याचा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणतेही कायदेशीर काम करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही अधिकारी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वारंवार नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती देण्याचे किंवा तक्रारी करण्याचे आवाहन करते.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

bribery employees of Nashik municipality in ABC Nashik Crime News
Find Nashik News, bribery employees of Nashik municipality in ABC News, Nashik Crime News, latest Nashik marathi news and Headlines based from Nashik City. Latest news belongs to Nashik crime news, Nashik politics news, Nashik business news, Nashik live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या