MCOCA : वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी व त्याचा 01 साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर अंतर्गत कारवाई

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नामे 1.रविंद्र वामन ढोले,वय-30 वर्षे,रा.गल्ली नं.4,साई जीम समोर,कर्वेनगर,पुणे (टोळी प्रमुख) व त्याचा एक साथीदार 2.प्रतीक प्रवीण दुसाने,वय-29 वर्षे,रा.प्लॉट नं.22,सोनामाता अपार्टमेंट,स्वरुप हाऊसिंग कॉलनी,आनंदनगर, सिंहगड रोड,पुणे यांचेवर शरीरा व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
यातील आरोपी नामे 1.रविंद्र वामन ढोले,वय-30 वर्षे,रा.गल्ली नं.4,साई जीम समोर, कर्वे नगर,पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) असुन,त्याने त्याचे इतर साथीदार 2.प्रतीक प्रवीण दुसाने,वय-29 वर्षे,रा.प्लॉट नं.22,सोनामाता अपार्टमेंट,स्वरुप हाऊसिंग कॉलनी,आनंदनगर,सिंहगड रोड,पुणे यांचेसह वारजे पोलीस स्टेशन या परिसर भागात खुनाचा प्रयत्न,खंडणी मागणे,जबरी चोरी,नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे,घातक शस्त्राव्दारे जखमी करणे,जीवे मारण्याची धमकी देणे,बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांचे आदेशाचा भंग करणे,चोरी करणे व सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपी यांचेविरूध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.426/2022,भादविक 452,387,392,504,506(2),34, महा.पो.का.क.142,क्रि.अमे.अॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने,तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्रास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2) व 3(4) चा अंतर्भाव करणेकामी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.दगडु हाके यांनी मा.श्रीनिवास घाडगे,पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, अतिरिक्त कार्यभार परि-3,पुणे यांचे मार्फतीने मा.श्री.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून,आरोपी नामे 1.रविंद्र वामन ढोले,वय-30 वर्षे,रा.गल्ली नं.4,साई जीम समोर,कर्वेनगर,पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) असुन 2.प्रतीक प्रवीण दुसाने,वय-29 वर्षे, रा.प्लॉट नं.22,सोनामाता अपार्टमेंट,स्वरुप हाऊसिंग कॉलनी,आनंदनगर, सिंहगड रोड,पुणे यांचे विरूध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.426/2022,भा.द.वि.क.452,387,392,504,506(2), 34,महा.पो.का.क.142,क्रि.अमे.अॅक्ट कलम 7 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(4) अंतर्भाव करण्याची मा.श्री. राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती.रुक्मिणी गलंडे,सहा.पोलीस आयुक्त,कोथरूड विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह-आयुक्त,श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर,श्री.राजेंद्र डहाळे, मा.श्रीनिवास घाडगे,पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा,अतिरिक्त कार्यभार,परि-3,पुणे मा.सहा. पोलीस आयुक्त,कोथरूड विभाग,पुणे शहर,श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.दगडु हाके,पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार सचिन कुदळे,अमोल भिसे,नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे व महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांनी केली आहे.
मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून,गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन 2022 या चालु वर्षातील 44 वी व एकुण 107 वी कारवाई आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.