Drugs worth 20 lakh seized in Pune : पुण्यात 20 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्ज जप्त. असा रचला पोलिसांनी सापळा

येरवडा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. 20 लाख रुपये किमतीच्या मेफेड्रोन (एमडी)सह त्यांना अटक करण्यात आली.
अफजल इमाम नदाफ (२६, रा. सोलापूर) आणि अर्जुन विष्णू जाधव (३२, रा. लोणावळा) यांना अटक करण्यात आली. येरवडा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी संगमवाडी परिसरात दोघेजण अंमली पदार्थ विकण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आणि २० लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले.
पोलिसांनी आरोपी अर्जुन जाधव याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली. सहा महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थाचा व्यापार सुरू केला. तपासानुसार जाधव आणि नदाफ यांनी मुंबईतून मेफेड्रोन आणले.
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनाेज साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, संदीप शिर्के, आदींनी ही कारवाई केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.