MD drug dealers jailed : मेफेड्रॉन (एम.डी.)हा अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारांना जेरबंद करुन दोन धडकेबाज कारवाई

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे अवैध धंदयाबाबत माहिती काढुन कठोर कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या त्यांचे सुचनेनुसार दिनांक 18/10/2022 रोजी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखे कडील पोलीस अंमलदार असे कोरेगांव पार्क पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पुणे- कोरेगांव पार्क येथील जर्मन बेकरी लेन नंबर ए सव्र्हे नंबर 294/3 येथील द योगी रेस्टोरंट समोर सार्वजनिक रोडवर च्या समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे इसम नामे 1.ऋशीकेश अनिल पासलकर,वय-25 वर्षे,रा.अपर डेपो,बिबवेवाडी,पुणे हा संशयितरीत्या मिळुन आल्याने,त्यास ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात किं.रु. त्याचे ताब्यात किं.रु. 1,04,550/- रु किचे 06 ग्रॅम 970 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व एक मोबाईल फोन 5,000/- रू किचा असा एकुण 1,09,550/- किचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
सदरचा एम डी हा अंमली पदार्थ त्यास इसम नामे 2.प्रणव प्रकाश ठाकुर,रा .204,रविवार पेठ,पुणे याने दिला असल्याने त्या दोघांचे विरुध्द कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.112/2022, एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क),22(ब),29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तदनंतर पाहिजे आरोपी प्रणव प्रकाश ठाकुर,रा.204,रविवार पेठ,पुणे याचा शोध घेतला असता,तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन कोरेगांव पार्क पो स्टे येथे हजर करण्यात आले आहे.
त्यानंतर दुस-या एका कारवाईत दिनांक 18/10/2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड,सहा.पो.निरीक्षक,शैलजा जानकर व स्टाफ असे फरासखाना, खडक, समर्थ पो स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना मौलाना अबुल कलाम चौक,तांबोळी मस्जिद समोर,इस्माईल हार्डवेअर दुकाना समोरील सार्वजनिक रोडवर,711 रविवार पेठ,पुणे येथे इसम नामे 3.विशाल नंदकुमार शिंदे,वय-41 वर्षे,रा.930/1,शुक्रवार पेठ,खडक पोलीस लाईन खोली नं.1,पुणे हा संशयितरित्या मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता,त्याचे ताब्यात किं.रु. 1,15,350/- रु चे 07 ग्रॅम 690 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), कि.रु. 20,000/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट. किं.रु 80,000/- ची एक अॅक्टीवा दुचाकी वाहन असा एकुण 2,15,350/- रु किंमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदरचा एम डी हा अंमली पदार्थ त्यास इसम नामे 4.जुनेद अफजल खान,रा.1011,रविवार पेठ,पुणे याने दिला असल्याने त्या दोघांचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.199/2022,एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम 8(क),22 (ब),29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तदनंतर पाहिजे आरोपी जुनेद खान याचा शोध घेतला असता,तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन फरासखाना येथे हजर करण्यात आले आहे.
प्रेसनोट क्रमांक - 711 दिनांक - 19/10/2022
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पो.आयुक्त,गुन्हे-1,श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1,गुन्हे शाखा,पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.