Drug gang busted : मेफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी जेरबंद एकुण 3,63,900 रुपये किंचा अंमली पदार्थ जप्त.

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक अधिकारी व अंमलदार असे वानवडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, दोन व्यक्ती लुल्लानगर येथील कलश प्युअर व्हेज हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी संशईतरीत्या मिळुन आल्याने नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर संशईत व्यक्तींना ताब्यात घेतले असता, मतीन हुसेन मेमन, वय-21 वर्षे, रा. कोंढवा,पुणे व शाहरुख कादीर खान,वय 29 वर्षे,रा. कोंढवा,पुणे यांचेपैकी मतीन हुसेन मेमन याचे ताब्यात कि.रु. 1,52,100/- रू किचा 10 ग्रॅम 140 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, तसेच शाहरुख कादीर खान याचे ताब्यात 1,51,800/- रू किचा 10 ग्रॅम 120 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ व एक मोबाईल फोन 10,000/- रू किची एक दुचाकी मोटार सायकल कि.रु. 50,000/- असा एकुण 3,63,900/- रु किचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
तसेच सदरचा एम.डी. हा अंमली पदार्थ त्यांनी अनमोलसिंग मनचंदा सिंग,वय-33 वर्षे,रा. एनआयबीएम रोड, पुणे याचेकडुन विक्रीकरीता आणला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन, मतीन हुसेन मेमन , शाहरुख कादीर खान आणि अनमोलसिंग मनचंदासिंग यांचेविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1,गुन्हे शाखा,पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक,श्रीमती.शैलजा जानकर, सहा.पोलीस निरीक्षक,लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार,मनोजकुमार साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.