Mephedrone : सहकारनगर परिसरामध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) तस्करी करणाऱ्याला अटक करून त्याचेकडुन एकुण 1,04,550/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी) जप्त

०४ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, श्रीमती.शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक-1 गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस हवालदार यांना खात्रीशीर बातमी मिळाली की,एक व्यक्ती अप्पु-गप्पु नर्सरी समोर,क्रांतीसुर्य,महात्मा ज्योतीबा फुले चौक,राऊत बाग,धनकवडी,पुणे येथील सार्वजनिक रोडवर अंमली ( Mephedrone ) पदार्थ विक्री करीता येणार आहे.
सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन,एका संशईत इसमास ताब्यात घेतले असता, रोहन काळुराम खुडे,वय-26 वर्षे,रा.स.नं.37/15,भांबरे संस्कृती भवन शाळे समोर,पर्वती दर्शन,पुणे याचे ताब्यात एकुण 1,04,550/- रु किंचा 06 ग्रॅम 970 मिलीग्रॅम एम.डी. ( Mephedrone ) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.213/2022,एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम 8(क),22(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामिगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1,गुन्हे शाखा,पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक,श्रीमती.शैलजा जानकर, सहा.पोलीस निरीक्षक,लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार,सचिन माळवे पांडुरंग पवार, विशाल दळवी, मनोज कुमार साळुंके, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.