गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई : अहमदाबादला शनिवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर महादेव बेटिंग अॅपच्या द्वारे कोट्यवधीचा सट्टा; पोलिसांनी आवळल्या चार बुकींच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) १४ ऑक्टोबर रोजी शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू होता.या सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सट्टेबाज यांच्या विरोधात गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.पोलिसांनी सिंधी काॅलनी भागात छापेमारी करून तिंघा बुकिंना अटक करण्यात आली आहे.दरम्यान या आरोपींकडून पन्नास हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.सदरची सट्टेबाजी ही महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन होत असल्याचे उघड झाले आहे.
या ऑनलाइन सट्टाबाज प्ररकणी गोंदिया पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.याबाबत अहमदाबाद येथील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी गोंदिया येथील सिंधी कॉलनी येथे छापेमारी करून तीन बुकीवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये धर्मेंद्र सुरेश ठकरानी.खानचंद संगतानी.व भरत भोजवनी अशी आहेत.व शहरातील सर्वात मोठा बुकी सोंटू अनंत जैन यांच्या वर कारवाई होत असतांनाही गोंदिया शहरात ऑनलाइन क्रिकेट सट्टा मोठ्या प्रमाणावर सुरूच होता ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बुकींवर कारवाई करण्यास सुरुवात केली.या प्ररकणी पुढील तपास गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दिनेश लबदे व पथकाने ही कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.