मनोज जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम : मनोज जरांगे पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन उपोषण करु नये म्हणून फोन

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करुन नये म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार मधील जेष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी आता पावने अकरा वाजता फोन करुन जरांगे पाटील यांना विनंती केली की आपण आमरण उपोषण करू नका मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.आम्ही तुम्हाला शब्द देतो आमचेच सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देतील तुम्ही साखळी उपोषण करा पण आमरण उपोषण करु नका असे फोन वरून बोलले पण उपोषण करणार मी माझ्या भुमिकेवर ठाम आहे . असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.ते बोलत आहे.आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलक संतप्त झाले असून सरकारला दिलेला अल्टिमेटमसंपला आहे.आता आम्हाला फोन केला तर आम्ही आता माघार घेणार नाही.आता प्रर्यत सरकारला आम्ही अनेक वेळा विनंती केली पण आता उपोषणच्या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत.आता पत्रकार परिषद झाल्या नंतर लगेच उपोषणाला सुरुवात होणार आहे.असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.मराठा समाजातील तरुणांनी शांततेत आंदोलन करावे असे कार्यकर्ते यांना आवाहन केले आहे. दरम्यान आज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केल्यावर राज्य सरकारचे धाबे दणाणले असून त्यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांना पुढे केले आहे.पण जरांगे पाटील यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम आहोत आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.