अमंली पदार्थ विक्री तस्करांचे मुंबई पोलिसांनी मोडले कंबरडे : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील फार्म हाऊसवर छापा मारुन ड्रगचा कारखान्यांवर मिराभाईंदर गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई एकाच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून ससून रुग्णांलयातून पोलिस कर्मचारी व रुग्णालयाच्या कर्मचारी यांच्या सहाय्याने पळून गेलेला ड्रग्स माफिया मुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे कारखाने सुरू होते.हे आता ठिक ठिकाणी पोलिसांच्या छापेमारी नंतर उघडकीस होत आहे.आता पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर मिराभाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून ड्रग्सच्या कारखान्याची पोलखोल केली आहे.व एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या ड्रग्स कारखान्यावरील छापेमारी बाबत स्थानिक पोलीस यांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे आता ड्रग्स माफिया यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.एकंदरीत आता मुंबई पोलिसांनी या ड्रग्स माफिया यांचे कंबरडे मोडले आहे.
पुण्यात पुणे पोलिसांनी पहिला ड्रग्स माफिया ललित पाटील याला पुण्यात ड्रग्स याला पकडले खरे पण त्याला न्यायालयात हजर करण्याआधीच तो पोलिस व ससून कर्मचारी यांच्या सहकार्याने तो पळून गेला व येथूनच सुरू झाला खरा ड्रग्सचा संपूर्ण महाराष्ट्रातील भांडाफोड आणि यानंतर मुंबई पोलिसांनी सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील शिंदे एमआयडीसी भागात छापेमारी करुन सुरूवात झाली आणि नंतर सोलापूर येथे देखील मुंबई पोलिसांनी छापेमारी करून ड्रग्सचा कारखाना उघडकीस आणला त्यानंतर काल संभाजीनगर येथे पुणे पोलिस अहमदाबाद येथील पोलिस यांनी ड्रग्स तब्बल ५०० कोटी रुपयांचा जप्त करण्यात आला.व आज पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर मिराभाईंदर पोलिसांनी छापेमारी करून ड्रग्सच्या कारखान्याची पोलखोल करुन एकाला अटक करण्यात आली आहे.या ड्रग्स कारखान्याबाबत मिराभाईंदर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.व नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.या कारखान्यांवर गोपनीयता पाळून कारवाई करुन कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.याबाबत स्थानिक पोलीसांना काहीही माहिती नव्हती.यातील एकाला वसईमधून अटक करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.