ED Officials Raid : या मंत्राचे घर समजून भलत्याच घरी मारला ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते ,आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. परंतु ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्याआधी सकाळी सकाळी एका भलत्याच उद्योगपतीच्या घरात घुसले. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सकाळी सहाच्या हसन मुश्रीफ यांच्या घरी धडकले.
कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि कागल विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दुसऱ्यांदा कारवाई केल्यानंतर कागल मतदारसंघामधील त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच मतदारांमध्ये संतापाचा कडेलोट झाला आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. दरम्यान, या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर तोफ डागली आहे. चार दिवसापूर्वीच कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीमध्ये छापेमारी करण्यासाठी वाऱ्या केल्या होत्या असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.