MMS scandal : महिला वस्तीगृहात बाथरूम मध्ये व्हिडिओ काढणारा एक जण गजाआड IT तील घटना

चंदीगड विद्यापीठा पाटोपाठ आता अजून एक विचित्र घटना मुंबईमधील आय आय टी तील एका विद्यार्थिनींनीचा अश्लील व्हिडिओ बनविण्याची एक घटना नव्याने समोर आली आहे. याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थिनींनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
चंदीगड विद्यापीठाच्या पाठोपाठ अजून एक अस्श्रिल व्हिडिओ प्रकरण आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईत समोर आले आहे. याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेबाबत सदरच्या विद्यार्थिनींनी आरोप केले आहे की. रविवारी रात्री कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडियो बनविला आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित पिंटू गरीया याला अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरी यायच्या मोबाईल मधून अद्याप व्हिडिओ सापडला नाही. याप्रकरणा नंतर आय आय टी तील कॅम्पस मध्ये एकच खळबळ उडाली आहे. कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाईपच्या डक्टवर चढून बाथरूम मधील व्हिडिओ बनवीत होता. आता पोलिसांनी त्याचा मोबाईल फुटेज चेक करीत असून प्रशासनाने तत्काळ कॅन्टीन बंद केले आहे. सदर कॅन्टीनमध्ये महिला कर्मचारी ठेवणार आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.