मराठा लाठीचार्ज प्रकरणी : मनसे प्रमुख राज ठाकरे आज अंतरवाली सराटी येथे उपोषण कर्ते व जखमींची घेणार भेट

पुणे दिनांक ४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणासाठी जालना येथी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांन अमानूष पणे लहान मुले व वयोवृद्ध महिला व पुरुष यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या घटने मुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.व त्या नंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली धाव अंतरवाली सराटी गावाकडे धाव घेतली आहे.दरम्यान आज ४ सप्टेंबर रोजी जालना दौऱ्यावर असून ते आज लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या व उपोषण कर्ते यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांचे औरंगाबाद येथील विमानतळावर आगमन होणार आहे.त्यानंतर पावने नऊच्या सुमारास जालना येथील अंतरवाली सराटीकडे कारने सकाळी साडे नऊ वाजता पोहचतील व गावातील उपोषण कर्ते व जखमींची भेट घेतील असे सांगण्यात आले आहे.दरम्यान मराठा समाजाच्या पाठीमागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठीमागील काळात ठाम पणे उभी राहिली आहे.व येथून पुढे देखील मराठा समाजाच्या बरोबर आहे.असे त्यांनी सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.