Crimes : हडपसर वैदवाडी येथील अट्टल गुन्हेगाराविरुधद मोक्का, पोलिस आयुक्तांकडूनही ५१वी संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे दिनांक २३ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हडपसर भागातील वैदवाडी या भागात दहशतनिर्माण करणाऱ्या सराईत अट्टल गुन्हेगार अक्षयसिंह जुन्नी व त्यांच्या अन्य तीन साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आता पर्यंत५१ व्या संघटित गुन्हेगारी टोळ्या विरुद्ध मोक्का कायद्याखाली कारवाई करुन पुण्यातील गुन्हेगारांन विरुद्ध चांगलीच जरब बसवली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी व त्यांचे मित्र त्यांच्या घरासमोर उभे असतांना आरोपी अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी ( वय २२ रा.वैदवाडी हडपसर पुणे) व त्यांच्या अन्य तीन साथीदार यांनी काही एक कारण नसताना फिर्यादी व त्यांचे मित्र यांना शिवीगाळ करून मारहाण केली.तसेच याभागात फ्लेक्स व बॅनर लावण्याचं काम करायचे असेल तर प्रत्येक महिन्याला हप्त्यांची मागणी केली.त्यावेळी आता पैसे नाहीत असे सांगितले त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचे हात पकडून ' तुला फार मस्ती आली आहे, तु कसा हाप्ता देत नाही ते बघतो,' असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.व धारदार शस्त्राने वार केले.व आम्ही इथले भाई आहे.व माझ्या विरोधात तक्रार केली तर मारुन टाकीन अशी धमकी देऊन वैदवाडी भागात दहशतनिर्माण केली.या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये आय.पी.सी.३०७,३८४,३२४,५०४,५०६,३४.महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी टोळी प्रमुख अक्षयसिंग बिरुसिंग जुन्नी ( वय २२ रा.वैदवाडी हडपसर पुणे) २) कुलदीप उर्फ जोग्या चंदनसिंग जुन्नी ( वय२१रा.बिराजदारनगर हडपसर पुणे) ३) विशाल उर्फ मॅक्स किशोर पुरेबीया ( वय २२रा.जुना म्हाडा कॉलनी हडपसर पुणे) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हे सर्व आरोपी रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार आहेत.यांच्या विरुद्ध हडपसर पोलिस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न.घरफोडी.चोरी.धारदार शस्त्राच्या सहाय्याने गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.यापूर्वी या आरोपींन विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.मात्र त्यांनी तरी देखील अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार केले आहेत. हडपसर पोलिस स्टेशन मध्ये.दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम 3(1) ( ||).3 ( 2) 3( 4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी परिमंडळ पाच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.यातील कागदपत्रांची छाननी करून अपर पोलिस आयुक्त यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अश्र्विनी राख- केदार या करीत आहेत.
हि कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार.पोलिस सहा आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा.पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख.सहाय्यक पोलिस आयुक्त अश्र्विनी राख -केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके पोलिस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले.सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका जगताप.सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बर्गे.पोलिस अंमलदार प्रविण शिंदे.महेश उबाळे.यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.