अपघातात सुदैवाने सहा वर्षांचा मुलगा बचावला आहे. : अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिंघाना चिरडले अपघातात सासू सासरे व सुनेचा मृत्यू

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बुलढाणा ते खामगाव रोडवर अज्ञात भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनांने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील सासू.सासरे व सून या तिंघाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या अपघात नंतर या भागात सर्वजण हळहळ व्यक्त करत होते.सुदैवाने यात सहा वर्षांच्या मुलगा बचावला असून त्याला उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघात प्ररकणी मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा शहरातील बुलढाणा ते खामगाव रोडवरील भादोला जवळील पोखरी फाट्यावर भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली व वाहन चालक पळून गेला.या अपघातात दुचाकीवरील तिघेजणांचा मृत्यू झाला आहे.यात सासू.सासरा.व सून या तिघांचा मृत्यू झाला आहे.तर सुदैवाने यात सहा वर्षांचा मुलगा बचावला आहे.त्याला उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.