आज पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक १२ ते २ पूर्णपणे बंद : पुणे ते मुंबई एक्सप्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पुणे वरुन मुंबईला एक्सप्रेस हायवे वरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे.मुंबई ते पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज दोन तासांचा बाॅल्क घेण्यात येणार आहे.दरम्यान आज या महामार्गावर मोठे दिशादर्शक फलक बसविण्या करीता या बाॅल्क घेण्यात येणार आहे.दरम्यान आज दुपारी १२ ते २ या कालावधीत पुण्याच्या बाजूने जाणारी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद राहणार आहे.
जुन्या महामार्गावरुन मुंबई ते पुणे महामार्गावर हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक व्यवस्था सुरू असणार आहे.दरम्यान आयटीएमएस प्रणालीच्या कामा करीता हा ब्लॉक घेण्यात आला आहे.एमएसआरडीसीच्या माहितीनुसार अमृतांजन पुलाच्या अलिकडे म्हणजे किलोमीटर ४५ व ४५.८००किलोमीटर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविली जाणार आहे.या कामांच्या वेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबविली जाणार आहे. तर हलकी वाहने जुन्या मुंबई ते पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.दरम्यान यावेळी मुंबई वरुन पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद असलीतरी पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक मात्र यावेळी सुरक्षित पणे सुरू असणार आहे.फक्त कार साठी जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावरील शिंग्रोबा घाटातील सुरू राहील अशी माहिती एमएसआरडीसीच्या वतीने देण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.