Dr Rahul Gethe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष कार्य अधिकारी डॉ.गेठे यांना जीवे ठार मारण्याची मोवाद्यांची धमकी - तपास यंत्रणा अलर्ट वर

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे ( Dr Rahul Gethe ) यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती नव्याने समोर आली आहे. याप्रकरणी तसे एक पत्रच मोवाद्यांनी प्रसिद्ध करून धमकी दिली आहे. सदरच्या धमकी पत्रामुळे तपास यंत्रणा चांगलीच अलर्ट झाली आहे.डाॅ. राहुल गेठे यांच्या निवासस्थानी मोवाद्यांनी रेड शाईने लिहिण्यात आलेले धमकीचे पत्रात त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान मोवाद्यांनी पाठविलेल्या पत्रात हिंदी भाषेत असा मजकूर आहे की. जय लाल सलाम. जय किसान.डाॅ. राहुल गेठे को आखरी चेतवाणी ... एकनाथ शिंदे का ऑफिसर डॉ राहुल गेठे बहुत उड रहा है.हमारा नुकसान गडचिरोली हे बहुत काम कर रहा है.हम हमारे भाईयोंका बदला जल्द ही लेने वाले है.उसकी मौत का एलान निकल चुका है.महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना है ले लो.जयनक्षलवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली काही वर्षांपासून डॉ. राहुल गेठे ( Dr Rahul Gethe ) हे विशेष कार्य अधिकारी. ( OSD) म्हणून कार्यरत असून यापूर्वी मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. व त्या कालावधीत त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासाची कामे जोरात सुरू केली होती. सदरच्या विकास कामाची अंमलबजावणी करून ती वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ राहुल गेठे यांच्या वर होती.
दरम्यान या त्यावेळी देखील मोवाद्यांनी त्यांच्या कामात प्रचंड असा अडथळा निर्माण करून सदरची कामे सुरू न करण्यासाठी त्यांना त्यावेळी देखील धमक्या दिल्या होत्या. पुन्हा एकदा त्यावेळी चे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर थांबलेली गडचिरोली मधील विकास कामे वेगाने करण्याचे आदेशच त्यांना दिल्यानंतर. डॉक्टर गेठे यांनी पुन्हा एकदा त्या भागातील कामांना नव्याने सुरुवात केल्यानंतर संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे ( Dr Rahul Gethe ) यांना पुन्हा एकदा टार्गेट करून त्यांना जीवे ठार मारण्याचे धमकी पत्रच त्यांच्या निवासस्थानी पाठविल्यानंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.