खासदार जलील व मोर्चेकरी ठेवीदार प्रचंड आक्रमक : खासदार जलील व आदर्श पतसंस्थाचे ठेवीदार मोर्चाकऱ्यांनी बॅरीकेट्स तोडले पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला

पुणे दिनांक १६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठवाड्यातील मंत्रीिमंडळाच्या बैठकीकडे छत्रपती संभाजी नगर मधील आदर्श पतसंस्थांच्या खातेदारक यांचा मोर्चा पोलिसांचे बॅरीकेट्स तोडून पुढे जात असताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज मोर्चा करी नागरिक यांच्यावर केला आहे.आता सद्य स्थितीत प्रचंड गोंधळ उडाला आहे.
दरम्यान या आदर्श पतसंस्थांच्या वतीने एकूण ५० हजार गोरगरीब जनतेचे करोडो रुपयांच्या ठेवीचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे.व ते ठेवीदार व खासदार इम्तियाज जलील हे मंत्रिमंडळाला निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांचा मोर्चा आडविला.यावेळी संतप्त झालेल्या जलील व मोर्चेकरी यांच्यात प्रचंड प्रमाणावर धक्काबुक्की झाली व यात संतप्त झालेल्या मोर्चेकरी यांनी पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स तोडून पुढे गेल्यावर पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केला.यात काही आंदोलक जखमी झाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.