भवानी पेठेतील काशेवाडीत करत होता दहशत : पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून एमपीडीएची कारवाई

पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत भवानी पेठ काशेवाडीत दहशत निर्माण करणांऱ्या सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख (वय २९ रा.हनुमान मंदिर जवळ काशेवाडी भवानी पेठ पुणे) यांच्या विरोधात पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.आरोपी नजीर शेख यांच्यावर खडक पोलिस स्टेशन मध्ये २०१९ पासून जीवे मारण्याचा प्रयत्न.मारामारी.जबरी चोरी.धमकी देणे.घातक शस्त्र जवळ बाळगणे.व्यापारी व बिल्डर यांच्याकडे खंडणी मागणे.असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.याला यापूर्वी तडीपार देखील करण्यात आले आहे.पण त्यांच्यात काहीच सुधारणा न झाल्याने अखेर खडक पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी त्यांच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. आयुक्त यांनी कागदपत्रांची पडताळणी करून एमपीडीए कायद्या अंतर्गत आरोपीची एमपीडीए कायद्या अंतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार.सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक.अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील.पोलिस उपायुक्त संदीप गिल्ल.सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ.यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ.पोलिस निरीक्षक गुन्हे.संपतराव राऊत.सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव.पोलिस उपनिरीक्षक अतुल बनकर.पोलिस अंमलदार नितिन जाधव.महेश पवार.स्वप्नील बांदल.यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.