Crime : मुंबई व पुण्याह पाच ठिकाणी एन.आय. ए. ची मोठी छापेमारी व पाच संशयितांच्या आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक ३ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राष्ट्रीय तपास यंत्रणा संस्थेने ( एन आय ए.) या संस्थेने एकाच वेळी मुंबई. ठाणे. व पुण्यात पहाटे छापेमारी करून एकूण ५.संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे ५.जण ' इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅड सिरीया ' ( इसिस) या दहशतवादी संबंध असल्याचा संशय या एन आय ए.राष्ट्रीय तपास संस्थेला आहे. या संदर्भात एन आय ए ने २८.जून रोजी गुन्हा दाखल करून नागपाडा. मधील संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते.
मुंबई मधील नागपाडा येथून आज सोमवार ३जुलै रोजी पहाटे अटक केलेल्या संशयितांचे नाव 'ताबीज ' असे तो इसिस या संघटनेतील अमीर नावांच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. तसेच याने ' व्हाईस ऑफ हिंद ' या इसिस च्या मासिकेत लेख लिहिला असल्याचा माहिती या सूत्रांनी दिली आहे. ताबीज हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपाडा येथील मुख्य कार्यालयाच्या अगदी जवळ राहणार होता व तेथूनच तो दहशतवादी संघटना इसिस च्या संपर्कात राहून अतिरेकी कारवाया करत असल्याचा समोर आले आहे. पण या संदर्भात मुंबई व ए.टी.एस.ला नव्हती. या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पण या बाबत एन.आय. ए. ने ठाण्यातील पडघा येथे दोन ठिकाणी छापेमारी केली व चार जणांना ताब्यात घेतले व पुण्यातीलकोंढवा येथे छापेमारी करून एकाला ताब्यात घेतले असे एकूण ५.जणांना ताब्यात घेण्यात आले असून हे ५.जण इसिस या संघटनेशी संपर्कात होते. या ५.जणांन कडे आक्षेपाह॔ कागदपत्रे मिळून आली आहेत. या बाबत पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एन आय ए. ) करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.