Mansoon : मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुण्यावरून मुंबईला येणारी वाहतूक दुपारी होणार बंद

पुणे दिनांक २४ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ रात्रीच्या वेळेस दरड कोसळली होती. या मुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. ही दरड हटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठा निर्णय घेतला आहे. आज दुपारी एक्सप्रेस वे वाहतूकी साठी बंद राहणार आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या मुळे दुपारी १२ ते २ या कालावधीत वाहतूक व्यवस्था बंद आसणार आहे. पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक व्यवस्था दोन तासांकरीता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. लोणावळा भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली तसेच महामार्गावर छोट्या मोठ्या दरड कोसाळण्याच्या घटना घडल्या आहेत. याच दरडी हटविण्यांचे काम चालू आहे. त्या मुळे हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे येतांना चिवळे पाॅइंट लागतो तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळविण्यात येईल .याच मार्गावरून चार चाकी .हलकी मध्यम .व अवजड स्वरूपाची वाहने जातील .व दुपारी १२ ते २ या दरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गावर वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्या नंतर मुंबईच्या दिशेने जाणारी लेन पुन्हा सुरू करण्यात येईल. अशी माहिती एमएसआरसीने दिलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.