Murder Threat in Pune : ‘‘पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन’’ पुणे परिसरात दहशत

जिवे मारण्याची धमकी दिऊन परिसरात दहशत पसरवरणाऱ्या पप्या भाई उर्फ वैभव उकरे व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.
दि.27.11.2022 रोजी पप्या उर्फ वैभव उकरे व त्याचे 8 ते 9 साथीदार हे आकाशनगर,जुना येथील फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी फिर्यादीच्या भावासोबत झालेला जुना वाद उकरून काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशाने मोठा दगड फिर्यादीच्या दिशेने मारलेला दगड त्यांनी चुकवला, त्याचा राग येवून पप्या उर्फ वैभव उकरे याने तोच दगड फिर्यादीच्या मोटार सायकलवर परत मारून मोटारसायकलचे नुकसान केले.
तसेच पप्या उर्फ वैभव याचेबरोबर असलेल्या 8 ते 9 साथीदारांपैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत
फिरवला व त्यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून ‘‘पप्पुभाई हा इथला भाई आहे’’ असे म्हणुन
‘‘पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन’’ असे म्हणून परिसरात दहशत
पसरविली व आरडा-ओरडा करत तेथून निघून गेले. वैभव उकरे उर्फ पप्या तसेच त्याचे सोबत असणारे
साथीदारांविरोधात फिर्यादीने कायदेशिर तक्रार दिल्याने वारजे माळवाडी पो स्टे 470/2022,भादवि
कलम 307,427,336,337,504,506(2),143,147,148,149, आर्म ऍक्ट 4(25),म.पो.का.क 37
(1)(3)/135,क्रि.लॉ.अमे.ऍक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे हा (टोळी प्रमूख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन
साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात मोक्का
कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री.डी.एस.हाके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वारजे माळवाडी
पोलीस स्टेशन,पुणे यांनी मा.श्री.सुहेल शर्मा,पोलीस उप आयुक्त,परि-3,पुणे शहर यांचे मार्फतीने
मा.श्री.राजेंद्र डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे यांना सादर केलेला होता.
सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे वैभव ऊर्फ पप्या शांताराम ऊकरे याने आपले
अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा ऍक्ट
केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.