नामदेव जाधव हे विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेले : नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे

पुणे दिनांक १८नोंव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर वक्तव्य केल्याबद्दल व शरद पवार यांचा जन्माचा बनावट दाखला सोशल मीडियावर व्हायरल करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी हे शरद पवार हेच आहे.असे म्हटले आहे.होते यावरुन आज पुण्यात नामदेव जाधव हे माध्यमांना बाईट देत असताना संतप्त झालेल्या शरद पवार गटाच्या वतीने त्यांना काळे फासून फटके देण्यात आले आहे.
दरम्यान याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील भांडरकर इन्स्टिट्यूट येथे नामदेव जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत घोषणा दिल्या नामदेव जाधव यांचे करायाचे काय अशा घोषणा देण्यात आल्या.दरम्यान नामदेव जाधव यांना काळे फासल्या नंतर ते विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत.दरम्यान यावेळी बोलताना जाधव यांनी जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहे की त्यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडले आहे.तर मी गावगुंडाना घाबरत नाही.असे ते म्हणाले आहेत.दरम्यान भांडारकर इन्स्टिट्यूट येथे त्यांचा कार्यक्रम होता पण त्यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली होती.ते प्रसार माध्यमांना बाईट देत असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घाटून काळे फासण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.