Opium plant : अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला चंदन नगर पोलिसांनी केले गजाआड

चंदन नगर भागातील साठे यांच्या बिल्डिंगमध्ये अफूचे बोंड्यांचा चुरा ठेवणाऱ्या ठगाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले आहे.पोलीसांनी त्याच्या कडून एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली आहे.
२४ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे चंदननगर पो. स्टे (chandannagar police station) यांना इसम नामे महिराम विष्णाई रा. संघर्ष चौक, अगरवाल हॉस्पीटल समोर साठे यांचे बिल्डींग मध्ये आफुचे बोंडांचा चुरा ठेवुन त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वपोनि राजेंद्र लांडगे (sr.inspector Rajendra Landage) यांनी पो.नि.गुन्हे श्री. रविंद्र कदम यांना कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश केल्याने पो. नि. गुन्हे रविंद्र कदम, सपोनि सोनवणे म.पो. उप-निरी मुळूक व पोलीस स्टेशन कडील स्टॉफ असे पंचासह बातमीचे ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री झाल्याने वाजता छापा टाकुन इसम नाम महिराम मनाराम बिष्णोई वय २८ वर्षे रा. व्दारा / ज्ञानेश्वर साठे, सर्वे नं.४५ / ६, संघर्ष चौक, अगरवाल हॉस्पीटल समोर, चंद्रभागा बिल्डींग चंदननगर पुणे. (मुळ गाव, संगिता कॉलणी, लोआवट, जि. जोधपुर राजस्थान) यांचे ताब्यात ६०,०००/ रु. कि.चा ०६ किलो ०५ ग्रॅम वजनाचा एका नायलॉनच्या पोत्यामध्ये अफुचा बोंडयाचा धुरा असलेला अमलीपदार्थ मिळुन आला. तो जप्त करुन त्याव्यात घेतला आहे.
आरोपी विरुध्द सपोनि श्री सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.३७६/२०२२ एन.डि. पी. एस अॅक्ट कलम १७ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन त्यास मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. २८/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोनि (गुन्हे) साो रविंद्र कदम हे करीत आहेत.
सदरची कारवाई हि मा. पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता सो पुणे शहर, श्री नामदेव चव्हाण सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री रोहीदास पवार सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ४, पुणे शहर, श्री. किशोर जाधव सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांचे मार्गदर्शना खाली व श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे श्री. रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपोनि श्री सोनवणे, म.पो. उपनिरीक्षक मुळूक चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे दिमतीत पो. अमंलदार भुजबळ, अविनाश संकपाळ, सुहास निगडे महेश नाणेकर, शिवाजी धांडे, श्रीकांत शेंडे, प्रदिप धुमाळ, गणेश हांडगर, विकास कदम, शेखर शिंदे, अनप सांगळे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, सचिन चव्हाण, आव्हाड, गडदरे यांनी केलेली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.