PFI : राष्ट्रीय तपास यंत्रणेची दुसऱ्यांदा पीएफ आय कार्यालयावर धाडीत २४७ जणांना केली अटक महाराष्टातील ४३ जणांचा समावेश

देशातील अनेक राज्यात मध्यरात्रीच्या सुमारास पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) ज्या ठिकाण्यावर NIA ने धाडी टाकून एकूण २४७ जणांना अटक केली आहे. या मध्ये महाराष्ट्र मधील एकूण ४३ जणांचा समावेश आहे तर पुण्यातील कोंढवा मधील ५ जणांचा समावेश आहे.
देशात आज पुन्हा दुसऱ्यांदा धाडसत्र मोहीम चालू केले असून एन आय ए ने PFI च्याआसाम कर्नाटक महाराष्ट्र दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात. इत्यादी ठिकाणी PFI च्या कार्यकर्त्यांच्या घरावर दार सत्र करून त्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र ४३, उत्तर प्रदेश ४४, कनार्टक ७२, आसाम २०, दिल्ली ३२, गुजरात १५, मध्ये प्रदेश २१, असे एकूण २७० जणांना तांच्या घरा मधून ताब्यात घेतले आहे. या धाडसत्र मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून यातील संख्यात वाढ होऊ शकते.
दिल्लीतील जामीया नगर भागात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. तसेच या भागात निदर्शन करण्यास बंदी घातली आहे. धरणे व प्रदर्शन मध्ये षडयंत्राचा समावेश असू शकतो म्हणून दोन महिने बंदी घालण्यात आली आहे तसेच जामिया विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यास बंदी असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कर्नाटक पोलिसांनी बिदर कोलार बागलकोट विजयपुरा मंगलोर इत्यादी ठिकाणी कारवाई करून पी एफ आय संघटनेची संबंधित असणाऱ्या एकूण ७२ जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद. सोलापूर अमरावती पुणे ठाणे व मुंबईमधून एकूण ४३ जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही केंद्रीय एजन्सी च्या माहितीवरून राज्यातील ज्या ज्या स्थानिक पोलिसांनी केली आहे. पुणे येथील कोंढवा भागातून ५ ते ६ जणांची त्यांच्या राहत्या घरा मधून उचलबांगडी करण्यात आली आहे. यापूर्वी १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.