शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप : नामदेव जाधव यांना काळे फासल्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष यांनी स्वीकारली

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) नामदेव जाधव यांना पुण्यात काळे फासल्याची घटना घडली आहे.दरम्यान आता या प्रकरणी "राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेव जाधव यांना काळे फासल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.दरम्यान यावेळी जगताप म्हणाले की.या नामदेव जाधव यांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती.एका शाळेत पैसे घेऊन मुलांचे मार्क्स वाढविल्या प्ररकणी त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली होती.आणि तो आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टिका करतोय," असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणी पुढे बोलताना" ते म्हणाले की लोकशाही मध्ये टीका करण्याचे अधिकार आहे.पण तो खऱ्या पुराव्यांवर आहे.जेष्ठ नेते शरद पवार हे मागील गेली ६० वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात आहे.त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात.दरम्यान हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते.पुरावे असतील तर निश्र्चित टीका करावी.आम्ही त्यांना ८ दिवसांचा कालावधी दिला होता.आम्ही इशारा देवून देखील ते टीका करत होते. म्हणून आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासले," असे शरद पवार यांच्या गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.