झोपेत असताना भूकंप झाला १२९ जणांचा मृत्यू तर २५० जण जखमी मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता : नेपाळात भूकंपामुळे १२९ जणांचा मृत्यू अनेक इमारती कोसळून अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

पुणे दिनांक ४ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पहाटे झालेल्या भूकंपामुळे नेपाळमध्ये हाहाःकार माजवला आहे.यात आतापर्यंत एकूण १२९ जणांचा यात मृत्यू झाला असून.अनेकजण भूकंपामुळे उध्वस्त व कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.त्यामुळे यात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.बचावकार्य युंद्ध पातळीवर सुरू आहे.जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.भूंकपाचा रिश्टर स्केल हा ६.४ एवढा आहे.
दरम्यान या भूकंपामुळे उत्तर भारतात प्रचंड धक्के जाणवले आहेत.दिल्ली.एनसीआर.उत्तरप्रदेश.बिहार.उत्तराखंड . हरियाणा.या भागात भूकंपाचे धक्के जाणवले यानंतर अनेकजण घराबाहेर पडले.मागील आठवड्यात देखील या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.दरम्यान भूकंपामुळे आज झालेल्या भूकंपात एकूण १२९ जण मृत्युमुखी पडले आहेत.तर एकूण २५० जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडे अकरा वाजल्यापासून एकूण तीन मोठे झटके बसले आहेत.यात नेपाळ मधील रुकुम व पश्चिम जाजरकोट याभागातील लोकांचा मृत्यू झाला आहे.या भागांतील अनेक इमारती कोसळून अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले आहेत.या ठिकाणी नेपाळचे लष्करी अधिकारी व कर्मचारी पोहोचले आहे.व बचावकार्य सुरू आहे.या भूकंपांचा केंद्रबिंदू हा जमीन खाली १० किलो मीटर होता.नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेपाळ मधील ती सुरक्षा अधिकारी व आरोग्य अधिकारी व कर्मचारी बचाव कार्य करीत आहेत.यात अनेक इमारती कोसाळल्या आहेत.व अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची मोठी शक्यता असून यात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.हे सर्वजण झोपेत असताना हा भूकंप झाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.