Crimes : कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएने छापेमारी करून तीन संशयितांना घेतलं ताब्यात

पुणे दिनांक १४ऑगस्ट( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएने छापेमारी करून दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.सदरची कारवाई ही १२ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.कोल्हापूर इचलकरंजी व हुपरी या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.एनआयएने एकूण १४ ठिकाणी ही छापेमारी केली आहे.सदरच्या छापेमारी मध्ये म्हत्वाची कागदपत्रे व लोखंडी शस्त्रे.व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.
दरम्यान या एनआयएने शनिवारी महाराष्ट्र.कर्नाटक.केरळ.पश्र्चिम बंगाल.व बिहार इत्यादी ठिकाणी छापेमारी केली आहे.अशी एकूण १४ठिकाणी ही छापेमारी केली आहे.या छापेमारीत एनआयएच्या हाती म्हत्वाची माहिती व कागदपत्रे लागले आहेत.संशयितांकडे मिळालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती नुसार पाॅप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही दहशतवादी संघटना २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा अजेंडा घेऊन काम करीत आहे.दहशतवाद , हिंसाचार कृत्यांचा माध्यमातून देशात २०४७ पर्यंत इस्लामिक खिलाफत आणण्याचा ' पीएफआय' चार उद्देश आहे.यासाठी युवाकांची दिशाभूल करुन त्यांना शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे ' पीएफआय' चे हे प्रयत्न रोखण्यासाठी ' एनआयए' कार्यरत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.