रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली : निजामुद्दीन - मिरज एक्सप्रेस इंजनसह एक डबा रुळावरून घसरला

पुणे दिनांक १६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) निजामुद्दीन रेल्वे जंक्शन वरुन मिरजकडे जाणारी निजामुद्दीन - मिरज एक्सप्रेस रेल्वे ट्रेन अमरगड रेल्वे स्टेशन जवळ रुळावरून घसरली आहे.यात इंजिन सह एक डबा रुळावरून खाली आला आहे.त्यामुळे या रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. आज मिरजवरुन निजामुद्दीन दर्शना रेल्वे ट्रेन सुरु केली होती.
दरम्यान या रेल्वे ट्रेनलि मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्गा कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.व याच दरम्यान आज ही या एक्सप्रेसची तिसरी फेरी होती .व याच फेरीला अपघात झाला आहे.दरम्यान या अपघाता बाबत खराब हवामानामुळे व पिाऊसामुळे दरडीचा काही भाग कोसळून अपघात झाल्याची शक्यता रेल्वे विभागाच्या प्रशासनाने वर्तविण्यात आली आहे.या ट्रेन अपघाता नंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.