आमच्यावर लावलेली सगळे कलमं लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर लावा : कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील आक्रमक

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आमच्यावर लावलेली सगळी कलमं पोलिस यांच्यावर पण लावा,कुणालाही सोडणार नाही; उपोषण कर्ते व मराठा आंदोलंकावर लाठीचार्ज व आरक्षणांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.मरठा आरक्षणाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून चालू आहे.तो काय अचानक पणे आपल्या मागण्या संदर्भात ऐनवेळी चालू केलेला नाही. त्यामुळे अशातच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण साठी बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी कडून अंत्यंत क्रुरपणे लाठीचार्ज करण्यात आला आहे.या घटनेत अनेक महिला व भगिनी तसेच वयोवृद्ध महिला व पुरुष जखमी झाले आहेत.याप्ररकणी जरांगे पाटील यांनी निषेध केला आहे.व तसेच संपूर्ण महाराष्ट्रात यांचा निषेध मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे.शांततेत चाललेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला मी त्यांना सोडणार नाही.आमची क्राॅस कम्पेंलेंट घ्या, अशी भूमिका आता जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात यांचे मोठ्या प्रमाणावर या प्रकरणी मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला . व ठिक ठिकाणी बंद करण्यात आला आहे.व अजून देखील हे बंद चालूच आहे.व याप्रकरणी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आंदोलंकावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी स्वतः मराठा समाजाच्या आंदोलकांची माफी मागितली व या लाठीचार्ज प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.या चौकशी साठी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे जालना जिल्ह्यात या प्रकरणी चौकशी करत आहेत.व त्यांनी आंतरवली सराटी गावात जाऊन उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.पण आता मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या लाठीचार्ज प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे व आमच्यावर ज्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसे गुन्हे हे पोलिसांवर लावावेत अशी त्यांनी मागणी केली आहे.व आमची देखील या प्रकरणी क्राॅस कम्पेंलेंट घ्या अशी मागणी त्यांनी आता केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.