Lonikand crime : लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीकडुन 02 पिस्टल व 05 जिवंत काडतुस जप्त

२९ सप्टेंबर २०२२ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पो.निरी.गजानन जाधव हे त्यांचे स्टाफसह नवरात्र उत्सवानिमित्त लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस अंमलदार, स्वप्निल जाधव यांना केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी माळवाडी येथील ज्योतीबा मंदिराजवळ पिवळया रंगाचा फुल बाहयांचा टी-शर्ट व निळया रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला एक मुलगा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली.
सदर बातमीचे अनुशंगाने गजानन पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे आरोपी शुभ्रत बाळासाहेब बनसोडे,वय-22 वर्ष,रा.आदर्श कॉलनी, अण्णा साहेब मगर कॉलेज जवळ,हडपसर,पुणे यास ताब्यात घेवुन,त्याचेकडुन 02 देशी बनावटीचे पिस्टल व 05 जिवंत काडतुस जप्त करण्यात आलेले असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरबाबत पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक,गजानन जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री.नामदेव चव्हाण,अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर,श्री.रोहीदास पवार,पोलीस उपआयुक्त,परिमंडळ 4,पुणे शहर, श्री.किशोर जाधव,सहा. पोलीस आयुक्त,येरवडा विभाग,पुणे शहर, श्री.गजानन पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर,श्री.मारुती पाटील,पोलीस निरीक्षक,(गुन्हे),लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गजानन जाधव, पोलीस अंमलदार,स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.