न्यायालयात येताना गणवेश का घातला नाही याबाबत १५ दिवसात उत्तर द्या.न्यायालयाची सहाय्य पोलिस आयुक्त यांना नोटीस : सिव्हिल ड्रेसवर न्यायालयात जाणं पडलं महागात, भूषण पाटील यांच्यावरील सुनावणी दरम्यान पोलिस आयुक्तांना नोटीस

पुणे दिनांक १६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील अमंली पदार्थ तस्करी प्ररकणी अटक करण्यात आलेल्या भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना त्यांची पोलिस कस्टडी संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.या सुनावणीच्या वेळी या गुन्ह्याचा तपास करण्याऱ्या तपास अधिकारी यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.यावेळी सह्हायक पोलिस आयुक्त हे सिव्हिल ड्रेसवर न्यायालयात आले होते.त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान आज ड्रग माफिया भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना त्यांची पोलिस कस्टडी संपल्यानंतर पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे हे न्यायालयात हजर होते.यावेळी त्यांनी पोलिस गणवेश परिधान न करता ते सिव्हिल ड्रेसवर होते.त्यामुळे त्यांना न्यायालयाने फटकारले.याआधी देखील पोलिस कस्टडी मागताना न्यायालयाने आरोपी ताब्यात असताना पळून गेला.या वरुन पोलिसांना चांगलेच फटकारले होते.यावेळी न्यायालय तपास अधिकारी यांना म्हणाले तुम्ही जबाबदार पदावर आहात हे वागणं तुम्हाला शोभत नाही.असं न्यायालयाने पोलिसांना ऐकवलं आहे. न्यायालयात येताना गणवेश का परिधान केला नाही.याचं उत्तर पुढील १५ दिवसात द्या.अशा शब्दात न्यायालयाने सहायक आयुक्त यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान ललित पाटील यांने ससून रुग्णांलयातून पलायन केल्यावर ११ ऑक्टोबर रोजी त्याचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना पोलिसांनी अटक केली.दोघां जणांना आज शिवाजी नगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायाधीश बिराजदार यांनी त्यांना २० ऑक्टोबर प्रर्यत पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान भूषण पाटील यांच्या निवासस्थानी पोलिसांनी जाऊन तपास करुन ८ पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.या ड्रग्स प्ररकाणात आणखी ६ आरोपींची नावे निश्र्चित करण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.