Koyta Gang : आता कोयता गॅगची लग्नाच्या वरातीत दहशत नाचतांना एकावर वार.

लग्नाच्या वरातीत नाचताना झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन 4 जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. कोयत्यासह, हॉकी स्टिक आणि बांबूने तरुणाला मारहाण केली आहे.
पुण्यातील हडपसर परिसरातील घटना ही घटना आहे. तर हा संपूर्ण प्रकार 15 जानेवारी रोजी घडला आहे. अमरदिप जाधव (19) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सोलापूर जिल्ह्यात जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नासाठी गेला होता.
लग्नावेळी फिर्यादी तरुण आणि यातील मुख्य आरोपी अमरदिप जाधव हे दोघे ही नाचत होते. नाचताना या दोघांमध्ये भांडण झाले आणि याचा राग जाधव याच्या मनात होता. पुण्यात 15 जानेवारी रोजी जाधव यांच्यासह तीन जणांनी फिर्यादी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याला हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली आणि तिथून पसार झाले.
सागर सुकळे (22) याच्यासह आणखी 3 अनोळखी तरुणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.