Suicide : सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आत्महत्या

पुणे शहरात सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकारी विभाच्या अधिकाऱ्याने केली आत्महत्या. या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील चौघात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गणेश शंकर शिंदे. ( वय.५२. रा.बालाजी हाईट्स.मंगळवार पेठ पुणे) हे सहकार विभागात लेखाधिकारी म्हणून काम करत होते. ते यापूर्वी मुंबई येथे कार्यरत होते. पण त्यांना पुणे येथे बदली पाहिजे होती. पण त्यांच्या बदलीसाठी त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पैसे मागितले म्हणून त्यांनी खाजगी सावकाराकडून २०ते २५ % टक्के दराने व्याजाने एकूण ८४ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे दिल्यानंतर त्यांची बदली मुंबईवरून पुण्याला झाली. परंतु सावकाराकडून घेतलेले कर्जाचे हप्तेही शिंदे भरू शकले नाही म्हणून सावकारांनी त्यांच्याकडे पैशासाठी तडका लावला होता.
याच दरम्यान त्यांनी सावकारांचे पैसे देण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा पंधरकर याने कर्ज मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले व त्यांना एक कोटी रुपयांचे पर्सनल कर्ज मिळवून दिले नाही. त्यांनी पण एक प्रकारे शिंदे यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला. यातच सावकाराचे पण रोज त्रास त्यांना होता व सावकार देखील त्यांना मानसिकरित्या त्रास देत होते. सावकाराच्या या त्रासाला कंटाळून गणेश शंकर शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यानुसार त्यांची पत्नी शोभना यांनी फरस खाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी व त्याचे वडील. बाळकृष्ण शिरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा पंधरकर या सर्व विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील विजय सोनी. बाळकृष्ण शिरसागर, गणेश साळुंखे व मनीष हाजरा यांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास हा पुरस्कार पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.