अंतरवाली सराटीत उपोषणकर्तेवर पोलिसांचा लाठीचार्ज प्रकरणी निषेधार्थ बंद : सकल मराठा समाजाच्या वतीने आज पिंपरी चिंचवड शहर बंद करत काढणार महामोर्चा

पिंपरी चिंचवड ९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणा साठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानूष पणे लाठीचार्ज केला व आंदोलंकाना मारहाण करण्यात आली होती.या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने बंद करण्यात येऊन महामोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान आजच्या मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आयोजित पिंपरी चिंचवड शहर बंदला सर्व समाजाच्या वतीने व सर्व राजकीय पक्षांनी व सर्व जाती धर्माच्या लोकांनी व व्यापारी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.जवळ जवळ शंभर संघटनांचा पाठिंबा दिला आहे.व मोर्चात सहभागी होणार आहेत.अशी माहिती मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश काळे यांनी सांगितले आहे.आज सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार आहे.हा मोर्चा पिंपरी मधील डिलक्स चौक येथून मेन बाजार पिंपरी मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणार आहे.व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलंकावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सर्व समन्वयक यांची निषेध सभा होऊन महामोर्चाची सांगता होईल दरम्यान बससेवा. व पीएमपीएमएल.बस शहरातील काही व्यापारी हे . स्वंयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत.व सर्व दुकाने व शाळा.महाविद्यालये माॅल आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.