Crime : पुण्यातील येरवडा येथे मेट्रोच्या चालू असलेल्या कामादरम्यांन दुर्घटना; मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कारवर कोसळला

पुणे दिनांक ११ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात सर्वत्रच काम सध्या मोठ्या प्रमाणावर चालू असताना मात्र काल रात्री येरवडा मध्ये एक घटना घडली असून.येरवडा येथे अशी घटना घडली आहे.मेट्रो स्टेशन येथे काम सुरू असताना लोंखंडी भाग खालून जाणाऱ्या एका कारवर अचानक पणे कोसळला.पंरतु सुदैवाने याअपाघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.सदरची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून सांगण्यात आले की.येरवडा येथे मेट्रोचे काम सुरू आहे.पुलाचे काम सुरू असतांनाच अचानक पणे या पुलाचा काही लोंखंडी भाग त्याचवेळी खालून जाणाऱ्या कारवर कोसळला.दरम्यान या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.सदरच्या दुर्घटना नंतर मेट्रोच्या कामाबद्दल आता पुणेकर नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करून यात कोणाचं निष्काळजीपणा आहे.त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.व पुढील काळात तरी कामात हलगर्जीपणा मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासनांने करु नये.अशी मागणी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.