Mansoon : मुंबई- गोवा महामार्गावर निवाळी घाटात महामार्ग ठप्प दरड कोसळली महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा

पुणे दिनांक २७ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राज्यात सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महामार्गावर आता दरडी कोसळण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आज सकाळी अशीच आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली आहे.त्या मुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. व दरड हटविण्यांचे काम सध्या प्रशासनाच्या वतीने चालू आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवस पाऊस कोसळत असल्या मुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या संपूर्ण भागातील नद्यांना व ओढ्याला तसेच नाल्यांना महापूर आला आहे. डोंगर द-यांतील पाणी महामार्गावर येत आहे. तसेच महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. हे चित्र सर्वच भागात पाहायला मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.