घट स्थापणे पूर्वी केज येथे घडली दुर्दैवी दूर्घटना सर्वत्र हळहळ : दसऱ्यानिमित्त घटस्थापनेनिम्मित घरातील कपडे धुण्यासाठी आई बरोबर गेलेल्या तीन मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या पासून सर्वत्र घटस्थापना होते आहे.व नंतर दसरा देखील आहे त्यामुळे आज घरामधील कपडे व इतर वस्तू धुणे धुण्यासाठी आई बरोबर गेलेल्या तीन लहान मुलांचा पाण्याच्या खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यात दोन मुले व एक मुलीचा समावेश आहे.
दरम्यान खदाणीत मृत्यू झालेल्या तीन मुलांचे नावे १) संतोष घोडके २) यश घोडके ३) वैष्णवी वैरागे.अशी आहेत या घटने बाबत मिळालेल्या माहितीनुसार दसरा व घटस्थापने निमित्त काढण्यात आलेल्या धुणे धुण्यासाठी आई सोबत ही मुले गेली होती.यावेळी आई कपडे धुत असताना मुले खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले व व त्यांना खदाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडत असताना आईने यावेळी आरडाओरडा केली त्यावेळी जमा झाल्याला नागरिकांनी बुडणाऱ्या दोन मुलांना वाचविले पण दुर्दैवाने यात दोन मुले व एक मुलगी असे तिंघेजण पाण्यात बुडाले व दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला आहे.सदरची घटना ही बीड रोड वरील केज येथील वडार वस्ती भागात असणाऱ्या खदाणीत घडली आहे.सदरच्या घटने नंतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले व यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.दरम्यान या दुर्घटने नंतर या गावातील सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.