Crime : उध्दव ठाकरे गटातील आमदांराना विधान सभा अध्यक्ष यांनी कशाच्या आधारे नोटीसा पाठविल्या...अॅड असिम सरोदे यांचा सवाल

पुणे दिनांक १०.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना एकनाथ शिंदे गट व उध्दव ठाकरे गटातील आमदांराना अपात्रतेची नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या वर विधान सभा अध्यक्षांच्या या निर्णया बाबत अॅड असिम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेआहेत. या संदर्भात सरोदे यांनी फेसबुक वर एक पोस्ट केली आहे. व त्यात ते म्हणाले " मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे १६ व व त्यांच्या बरोबर गेलेल्या अन्य आमदारांना अपात्रतेची नोटीसा नुसार कारणे / व स्पष्टीकरण द्या असे आदेश सभापती नार्वेकर यांनी विधान साचिव यांच्या मार्फत देणे समजण्या सारखे आहे " असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे ते म्हणतात " मात्र उध्दव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतील आमदारांना अपात्रतेची कारवाई का करू नये याचे स्पष्टीकरण / कारणे दाखवा नोटीसेस नार्वेकर यांनी कशाच्या आधारे पाठवल्यात या बाबत जाणून घेण्याची कायदेशीर- उत्सुकता मला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या १४१ पानाच्या निकालात २०६ ड , या परि-छेदामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. की विधीमंडळ पक्ष प्रतोद नेमु शकत नाही. प्रतोद नेमण्याचा अधिकार मूळ राजकीय पक्षालाच आहे "
" विधान सभा अध्यक्षांनी ओरिजनल राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीपच मानावा. १५६ व्या परिच्छेदात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपात्रते बाबत प्रक्रिया करतांना निवडणूका आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही संदर्भविधान सभा अध्यक्षांनी घेऊ नये. म्हणजेच शिवसेना कोणाची या बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता नार्वेकर यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे "
" सर्वोच्च न्यायालयाने १२३.व्या परिच्छेदात सांगितले आहे की एकनाथ शिंदे यांना विधीमंडळाचा लिडर म्हणून मान्यता देण्याचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय बेकायदेशीर होता. ११९.व्या परि-छेदात स्पष्ट केले आहे की ३ जुलै २०२२ रोजी भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रतोद म्हणून मान्यता दिली. तो निर्णय म्हणून मान्यता दिली. तो निर्णय बेकायदेशीर होता "
" याचाच अर्थ भरत गोगावले यांनी उध्दव ठाकरे ठाकरे यांच्या मूळ शिवसेना पक्षातील आमदारांना अपात्र ठरविण्या संदर्भातील विधान सभा अध्यक्षांकडे दिलेला प्रस्ताव सुध्दा बेकायदेशीर आहे. २ दिवसांपूर्वी विधान सभा अध्यक्षांनी उध्दव ठाकरेच्या मूळ शिवसेनेतील आमदारांच्या नावाने अपात्रते संदर्भात काढलेल्या कारणे दाखवा नोटीस बेकायदेशीर व घटनाबाह्य आहेत " असे मत अॅड असिम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.