Mantarwadi crime : मंतरवाडी येथे ट्रक ड्रायव्हरला लुटणाऱ्या एकास अटक दोघे फरार

मंतरवाडी येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या पुढे एका ट्रक ड्रायव्हरला लुटणाऱ्या तिघा आरोपी पैकी एकाच हडपसर पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघेजण मात्र फरार झाले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव सुनील चव्हाण. ( वय २२. रा. भराडी वस्ती वैदवाडी हडपसर पुणे.) अशी आहे. सदर चोरीच्या घटनेबाबत हडपसर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. ट्रक ड्रायव्हर राम मोहाळे ( वय.२७. रा. खोकलेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी ) मोहाळे हे २५ सप्टेंबरला रात्री एक वाजण्याच्या सुमारास मंतर वाडी रोड वरून जात असताना मंतरवाडीतील सीएनजी पेट्रोल पंपाच्या पुढे त्यांच्या गाडी पुढे नितीन व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी मोटरसायकल वरून येऊन त्याला एक साईडला थांबण्यास सांगून त्यांची मोटरसायकल पुढे लावून गाडीमध्ये चढून त्यांना मारहाण करून.१०. हजार रुपये रोकड व ५ हजार रुपयांचा मोबाईल.असा एकूण १५. हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सदर चोरी प्रकरणी मोहाळे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानंतर पोलिसांनी तिघांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून. एकास अटक केली आहे. या चोरी प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.