पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दुर्दैवी घटना : गणेशोत्सवासाठी लावलेल्या लायटिंगचा मध्यरात्री शाॅट सर्किटमुळे 🔥 आग लागून एकाचा मृत्यू

पुणे दिनांक २४ सप्टेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे.मोठ्या आनंदाने एका युवकाने गणेशांची प्राणप्रतिष्ठापना केली होती व गणपती बाप्पासाठी विद्युत रोषणाईची आरस करुन इलेक्ट्रिक माळ लावली होती.रात्री अचानक पणे शाॅक सर्किटमुळे 🔥 आग लागली व मध्यरात्री घराला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले.यात गणेश भक्त व सर्पमित्र वैभव गरुड यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव गरुड हा गणपती बाप्पा असलेल्या रुम मध्ये रात्री.झोपला होता तर पत्नी आणि मुले आतील दुसऱ्या रुम मध्ये झोपले होते.शनिवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक माळेचा शाॅक सर्किटमुळे आग लागली.आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत दोन मुली व पत्नी यांना बाहेर काढले त्यामुळे तिंघेजन या आगीच्या घटना मधून वाचले आहे.परंतू वैभव याचा मृत्यू झाला. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे . दरम्यान वैभव हा सर्पमित्र होता परंतु त्यांचा शाॅक सर्किटमुळे मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.