Crime : भरघाव कारने दुचाकीला फुटबॉल सारखे हवेत उडविले एक जणांचा मृत्यू तर एक गंभीर रित्या जखमी. अपघाता नंतर कार चालक फरार

पुणे दिनांक १८जुलै (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर रित्या जखमी झाला आहे. सदरचा अपघात हा पुणे ते नाशिक महामार्गावर संतवाडी फाट्या जवळ झाला आहे. हा अपघात भीषण असा अपघात होता यात भरघाव वेगाने कारने दुचाकीला फुटबॉल सारखे उडविले आहे. व अपघात करून फरार झाला आहे.
दुचाकी स्वार हा रस्ता ओंलडत असतांना समोरच्या दिशेने भरघाव वेगाने येणा-य कारने बाईकस्वारला जोरात धडक मारली बाईक ही हवेत उडून खाली कोसळली . नंतर कार चालक न थांबता फरार झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अपघाता मध्ये जखमी झालेल्या युवकांना रूग्णालयात दाखल केले. यात सुरेश जेडगुले या युवकाचा मृत्यू झाला आहे. तर अनिल निमसे हा युवक हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या वर उपचार सुरू आहेत. या अपघाताची घटना कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.